चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वृद्ध आईची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या केअर टेकर महिलेने सोन्याचे दागिने चोरल्याची घटना औंध परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ते २० सप्टेंबर या दरम्यान ही घटना घडली आहे.
प्लॅट नंबर ०३, मारोतीराव गायकवाड नगर, औंध येथील एका महिलेने या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांनी आईची देखभाल करण्यासाठी संबंधित महिलेला केअर टेकर म्हणून कामावर ठेवले होते.
मात्र, तिने ७,२४,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरले आहेत, अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक प्रणिल चौगुले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
















