महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी भूम शहरातील सर्व कामगारांची मोफत नोंदणी व नूतनीकरण अभियान राबविण्यात आले.
महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत कामगारांना मिळणाऱ्या योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संयोगिताताई गाढवे यांच्या वतीने हे अभियान पार पडले.
खास नवरात्री महोत्सवानिमित्त भूम शहरातील कामगारांचे मोफत नोंदणी व नूतनीकरण अभियान गुरुवारी (दि. १० ऑक्टोबर २०२४) रोजी भूम शहरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, कोर्टासमोर आयोजित करण्यात आले होते.
या अभियानाला शहरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. माजी नगराध्यक्षा संयोगिताताई गाढवे यांनी सर्व महिलांचे व आलेल्या कामगारांचे आभार मानले. या अभियानाचा लाभ हजारो महिलांनी व कामगारांनी घेतला.


 
			

















