महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : पुण्यातील लक्ष्मी रोड येथे युवा उद्योजक आशिष गांधी यांच्या गांधी हाऊस ऑफ ज्वेलर्स या सोन्याच्या दालनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.
यानिमित्ताने ४, ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी विविध सोयी-सुविधांचा लाभ ग्राहकांना देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री, तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ उद्योजक प्रकाश धारिवाल, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, बांधकाम व्यावसायिक जयंत शहा, उद्योगपती विशाल चोरडिया उपस्थित होते.
यावेळी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, विजयकांत कोठारी, आनंद भंडारी, कृष्णकुमार गोयल, पोपटलाल ओस्तवाल, भरत शहा, फत्तेचंद रांका, रवींद्र सांकला, रायचंदजी कुंकूलोळ, प्रमोद दुगड, आचल जैन, रमणलाल लुंकड, सतीश बोरा, विजय भंडारी, संजय चोरडिया, वालचंद संचेती, सुमतीलाल लोढा, सुनील मुनोत, बाळासाहेब ओसवाल, प्रवीण चोरबेले, अनिल भन्साळी, राजेंद्र बांठिया, दीपक शहा, बाळासाहेब धोका, विलास राठोड, पुष्पा कटारिया, अनुराधा संचेती, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचे संपादक अभिजित डुंगरवाल, जैन जागृतीचे संपादक संजय चोरडिया, अभय छाजेड, अविनाश कोठारी, सचिन गांधी, लखीचंद खिवंसरा, युवराज शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
आलेल्या मान्यवरांचे गांधी हाऊस ऑफ ज्वेलर्स आणि गांधी परिवाराने स्वागत केले व आलेल्या पाहुन्यानी व ग्राहकांनी गांधी हाऊस ॲाफ ज्वेलर्स ची नाविन्य पूर्ण रचना व तेथील विविध प्रकारचे गोल्ड ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी, सिल्वर कलेक्शन पाहून सर्व खूष झाले.

