आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जैन साधू-संतांच्या पदयात्रेला पोलिस संरक्षण मिळणार

Spread the love

मुंबई : जैन साधू-संतांच्या पदयात्रेदरम्यान होणारे अपघात आणि हल्ले टाळण्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण देण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांनी दिले आहेत.

राज्यात जैन साधू-संत पदयात्रा करतात. त्यावेळी महामार्गावर काही अपघात होतात, तसेच काही ठिकाणी असंतुष्ट सामाजिक घटकांकडून जैन साधू-संतांवर हल्ले करण्यात येतात.

त्यामुळे सर्व पोलिस अधिकारी आणि घटक प्रमुखांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जैन साधू-संतांचा दौरा असताना आढावा घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, असे देवेन भारती यांच्या आदेशात म्हटले आहे.

सर्व पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षक यांना हे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन यांनीही यासंदर्भात आदेशाचे पत्र काढले आहे.