पर्वती पोलीस स्टेशनची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आगामी विधानसभा निवडणूक आणि नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बेकायदा शस्त्रास्त्रे व अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांनी दिले आहेत.
त्यानुसार, पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी त्यांच्या अधिपत्याखालील गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार आणि त्यांच्या टीमला सूचना दिल्या.
त्यानुसार, तपास पथकातील पोलीस अंमलदार पुरषोत्तम गुन्लावराधाग शेख यांना खात्रीशीर बातमी मिळाल्यावर, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणारा इसम अक्षय महादेव सूर्यवंशी, वय १९ वर्षे (रा. स.नं. १३२, सानेगुरुजी शाळेसमोर, दांडेकर पुल, सिंहगड रोड, पुणे) याला दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी बेकायदेशीर देशी पिस्तलासह पकडण्यात आले आहे.
त्याच्यावर पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पर्वती पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे करत आहेत.
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त (परि. ३) संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त (सिंहगड विभाग) जगदीश सातव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, पोहवा प्रकाश मरगजे, पुरषोत्तम गुन्ला, अमित चिव्हे, सद्दाम शेख, अमोल दबडे, अनिस तांबोळी, सुर्या जाधव, शिवाजी पाटोळे, अविनाश कांबळे आणि राकेश क्षीरसागर यांनी केली आहे.
