फरासखाना पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पी.एम.टी. बस तसेच गणेशोत्सवाच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे सोन्याचे दागिने चोरी करणारे आरोपी फरासखाना पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्याकडून एकूण ७,३४,०६४/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पी.एम.टी. बसमध्ये तसेच गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासंबंधी फरासखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रशांत भस्मे यांनी तपास पथकातील अधिकारी वैभव गायकवाड आणि अरविंद शिंदे यांना सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि तपास पथकातील पोलिस अधिकारी कारवाई करत होते. दि. ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी अमंलदार गजानन सोनुने आणि प्रविण पासलकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, सुर्या हॉस्पिटलसमोरच्या पी.एम.टी. बसस्थानक, कसबा पेठ, पुणे येथून १) विकी कृष्णा माने, वय १९ वर्षे (रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे, मुंढवा पोलीस चौकी समोर, मुंढवा, पुणे), २) राज कृष्णा माने, वय २३ वर्षे (रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे, मुंढवा पोलीस चौकी समोर, मुंढवा, पुणे), ३) कृष्णा रमेश माने, वय ४४ वर्षे (रा. सरोदय कॉलनी, प्रकाश जनरल स्टोअर्स मागे, मुंढवा पोलीस चौकी समोर, मुंढवा, पुणे), ४) सुधीर नागनाथ जाधव, वय ४६ वर्षे (रा. साऊथ इंडियन हायस्कूल, शास्त्रीनगर, घर नं. ७६८, अंबरनाथ पश्चिम, जि. ठाणे), ५) संतोष शरण्णाप्पा जाधव, वय ४० वर्षे (रा. घुलेनगर, लेन नं. २, वरद हॉस्पिटलसमोर, मांजरी बुद्रुक, पुणे) यांना अटक करण्यात आली.
पोलीस कस्टडी दरम्यान येरवडा पोलीस स्टेशनकडील एक गुन्हा आणि फरासखाना पोलीस स्टेशनकडील तीन गुन्हे असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून १०२.६२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोरीसाठी वापरलेले लोखंडी कटर असा सर्व मिळून ७,३४,०६४/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तपास पथकाला यश आले आहे.
सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव, स.पो.नि. वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सपोफौज मेहबुब मोकाशी, पोलीस अमंलदार गजानन सोनुने, नितीन तेलंगे, महेश राठोड, संदीप कांबळे, प्रविण पासलकर, नितीन जाधव, तानाजी नागरे, वैभव स्वामी, विशाल शिंदे, अर्जुन कुडाळकर, समीर माळवदकर, वसिम शेख, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे, चेतन होळकर यांनी केली आहे.

