महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : आरोग्य दूत डॉ. राहुल घुले अधिकृतरित्या तानाजी सावंत गटातून बाहेर पडत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिल्यास किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत डॉ. घुले यांनी पत्रकार परिषद घेत दिले आहेत.
ऑगस्ट मध्ये डॉ. राहुल घुले यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गटात पुणे येथे प्रवेश केला होता. परंतु अवघ्या दोनच महिन्यात सावंत गटामधून बाहेर पडत विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांना प्रवेश घेतल्यापासून कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिली नसल्याचे त्यांनी सांगितले व मानसन्मान देखील दिला नसल्यामुळे गटातून बाहेर पडून सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेच्या आखाड्यात उतरून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी लढत राहीन.
सर्व समाजासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ. घुले सांवत गटातून बाहेर पडल्यामुळे सावंत गटाला एका प्रकारे धक्काच असल्याचे बोलले जात आहे. डॉ. राहुल घुले यांनी गेल्या एक वर्षापासून भूम, परंडा, वाशी मतदारसंघात आरोग्य विभागात मोफत शस्त्रक्रिया करून व मतदार संघातील वयोवृद्ध नागरिकांना काठ्या देऊन या भागात मदतीचा हात दिला होता.
त्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवले. शेतीचे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोफत विद्युत रोहित्र, वाहतूक, लग्न समारंभासाठी मोफत भांडी व साहित्य देण्याचे उपक्रम त्यांनी राबवले असल्यामुळे भूम परंडा वाशी मतदारसंघातील नागरिकांमध्ये डॉ. घुले विषयी वेगळे स्थान निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते.
परंतु त्यांना तानाजी सावंत गटात प्रवेश घेतल्यानंतर मतदारसंघांमध्ये विविध चर्चेला उधान आले होते परंतु त्यांनी सावंत गटातून बाहेर पडून विधानसभा लढवण्याचे ठरवल्याने सांवत गटाला एका प्रकारे मोठा राजकीय धक्काच दिला असल्याचे बोलले जात आहे.

 
			

















