महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : श्रीकांत पांगारकर यांच्या शिवसेनेतील नियुक्तीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे स्थगिती देण्यात आली आहे.
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जालना विधानसभेच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीवरून शिवसेनेवर चौफेर टीका झाली.
विरोधकांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी पांगारकर यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नियुक्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने श्रीकांत पांगारकर यांना जालना जिल्ह्यात शिवसेना पक्षाचे जर कोणतेही पद देण्यात आले असेल, तर त्या पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याचे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.