वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मित्राला मारल्याच्या कारणावरून एका टोळक्याने दोघांवर लोखंडी धारदार शस्त्राने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना कर्वेनगर येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंहगड रोडवर राहणाऱ्या एका तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. चंद्रलोक बियर बार गार्डन, कर्वेनगर येथे फिर्यादी तरुण व त्याचे इतर तीन मित्र होते.
त्यावेळी तिथे आलेल्या तीन इसमांनी आणि त्यांच्या साथीदारांनी, मित्राला मारल्याच्या कारणावरून लोखंडी शस्त्राने हल्ला करून फिर्यादीला गंभीर जखमी केले आणि परिसरात दहशत निर्माण केली. पोलीस निरीक्षक निलेश बडाख या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

















