दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अंभोरा पोलीस स्टेशन (जि. बीड) आणि पाथर्डी पोलीस स्टेशन (जि. अहमदनगर) येथील गुन्ह्यांमध्ये दीड महिन्यांपासून फरार असलेले दोन आरोपी आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात पोलीस पथकाला यश आले आहे.
आगामी विधानसभा २०२४ च्या पार्श्वभूमीवर दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक १ चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार गस्त घालत असताना पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, अंभोरा पोलीस स्टेशन (जि. बीड) येथील गुन्ह्यातील आरोपी आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक सार्वजनिक रस्त्यावर उभे आहेत.
माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांना माहिती कळविण्यात आली. त्यांनी आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत: १) रोहित गुरुदत्त वाघमारे, वय २९ वर्षे, (रा. मुळगाव माळीचिंचोरा, ता. नेवासा, जि. अहमदनगर, सध्या रा. यशोदिप चौक, चौधरी बिल्डिंग, वारजे माळवाडी, पुणे), २) शुभम चांगदेव धनवटे, वय २० वर्षे, ( रा. मुळगाव- वडाळा महादेव, पाण्याच्या टाकीजवळ, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) आणि एक विधीसंघर्षग्रस्त बालक आरोपींना पुढील कारवाईसाठी अंभोरा पोलीस स्टेशनच्या (जि. बीड) ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस उप निरीक्षक शाहीद शेख, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, प्रदीप राठोड, अजित शिंदे, इरफान पठाण, दत्तात्रय पवार, मनिषा पुकाळे, रविंद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, अमित गद्रे, शिवाजी सातपुते, अक्षय गायकवाड, नारायण बनकर, दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली.
