महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध गायक योगेश जैन यांच्या सप्तसूर म्युझिक अकॅडमी पुणेच्या वतीने सप्तसूर संगीत महोत्सव व सप्तसुरचे वार्षिक स्नेहसंमेलन 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह येथे संपन्न होणार आहे. यामध्ये योगेश जैन यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाची सुरुवात होणार असून सप्तसूर अकॅडमीच्या २०० विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन – वादन (तबला, पखवाज, हार्मोनियम, कीबोर्ड, गिटार) सादरीकरण होणार आहे.
तसेच पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य शंतनु गोखले यांचे संतूर वादन, पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य सुधाकर चव्हाण यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. अशी माहिती सप्तसुर अकॅडमीचे योगेश जैन यांनी दिली.

















