महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
आकुर्डी : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयात महिला सहकाऱ्यांच्या वतीने “आंतरराष्ट्रीय पुरुष दिन” साजरा करण्यात आला. “पॉझिटिव्ह रोल मॉडेल्स” ही या वर्षाची थीम होती. विशेष कार्यक्रम आयोजित करून सर्व पुरुष सहकाऱ्यांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या.
यावेळी नाविन्यपूर्ण आणि मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी बोलताना उप-प्राचार्या डॉ. शिल्पा चौधरी यांनी पुरुष दिन सुद्धा महिला दिनाप्रमाणे सर्वांनी साजरा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुरुष दिन यथायोग्य पद्धतीने साजरा करत आमच्या महिला सहकाऱ्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा संदेश समाजाला दिला आहे असे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
प्रा. वैभव वैद्य यांनी सर्व प्राध्यापकांच्या वतीने सर्व महिला सहकाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा. तेजश्री देवकुळे, प्रा. पूनम मुळे, प्रा. आरती पाटील, प्रा. पल्लवी सोमठाणे, प्रा. काजल पाटील आणि प्रा. किरण मखिजा यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. गायत्री पाटील यांनी केले.

















