दर्जेदार हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम शिक्षण आणि उत्कृष्ट इंटर्नशिपचा २१ वर्षाचा वारसा अबाधित : प्रा डॉ संजय बी चोरडिया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम या संस्थेस हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमधील गुणवत्तापूर्ण व प्रात्यक्षिक आधारित प्रशिक्षण, इंटर्नशिपच्या संधी, प्लेसमेंट्स आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यात प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी या सर्व बाबी लक्षात घेऊन नुकतेच ग्लोबल ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट सेन्टरच्या वतीने घोषित करण्यात आलेल्या २०२४ च्या यादी मध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम क्षेत्र विभागात तिसरे स्थान मिळाले आहे.
याआधीही हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रातील ‘सूर्यदत्त’ला सर्वोत्कृष्ट हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट म्हणून विविध नामांकित संस्थांच्या वतीने गौरवान्वित केलेले आहे. संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदरातिथ्य आणि प्रवास शिक्षणाचा उत्कृष्ट दर्जा या रँकिंगमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
जागतिक स्तरावरील कामाच्या स्वरूपाचे विद्यार्थ्यांना आकलन व्हावे यासाठी नामांकित वैश्विक संस्थांशी ‘एससीएचएमटीटी’ने सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये स्विस्सम रशिया, लिंकन विद्यापीठ मलेशिया, लंडन अकॅडमी ऑफ प्रोफेशनल ट्रेनिंग (एलएपिटी), अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशन इन्स्टिट्यूट (एएचएलईआय), आदी संस्थांचा समावेश आहे.
सावित्राईबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित, ‘नॅक’ अधिस्वीकृतीधारक आणि तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त ‘एससीएचएमटीटी’ची स्थापना २००५ मध्ये झाली. संस्थेने २१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. कॉलेजला आयएसओ ९००१:२०१५ असे प्रमाणपत्र मिळालेले आहे.
‘एससीएचएमटीटी’ तर्फे बीएस्सी इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज हा अभ्यासक्रम चालवला जातो. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील व्यावसायिक आणि उद्योजक घडविण्यावर येथे भर दिला जातो. अभ्यासक्रमातील शिक्षणासोबतच ‘एससीएचएमटीटी’च्या वतीने प्रस्थापित हॉटेल्स, रेस्टारंट, औद्योगिक कंपन्यांना भेटी, विविध विभागातील तज्ज्ञांचे चर्चासत्र, राजस्थान, गोवा, कर्नाटक अशा विविध राज्यातील स्वादिष्ट भोजन, विविध संकल्पनेवर आधारित फूड फेस्टिवल आयोजिले जातात.
या क्षेत्रातील प्रत्यक्ष आणि व्यापक ज्ञान विद्यार्थ्यांना घेता यावे यासाठी अनेक उपक्रम राबवून त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाते. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन चे संस्थापक व अध्यक्ष म्हणाले, ‘एससीएचएमटीटी’मध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकवृंद, उत्तम पायाभूत सुविधा आहेत.
आजवर विक्रमी प्लेसमेंट्स करत देशात आणि विदेशात ‘एससीएचएमटीटी’चे विद्यार्थी यशस्वीपणे आपले करिअर घडवत आहेत. सिंगापूर, मलेशिया, मॉरिशस, अमेरिका, न्यूझीलंड यासह इतर अनेक देशांत ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम काम करत आहेत.
मॉरिशसमधील शांग्रीला हॉटेल, जर्मनीतील रिटलबर्ग हॉटेल, मलेशियातील हिल्टन, चीनमधील इंडियन किचन स्पाईसेस लिमिटेड, सिंगापूरमधील द रिजंट, अमेरिकेतील हॉलिडे इन, फ्लोरिडामधील रिनाइसन्स, पटायातील सन सिटी, सिंगापूरमधील मेरियट यांसारख्या पंचतारांकित हॉटेल्स मध्ये ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी वरिष्ठ पदांवर कार्यरत आहेत.
तसेच अनेकांनी आपला स्वतःचा व्यवसायही सुरु केला आहे.” ‘एससीएचएमटीटी’ने २०२१ मध्ये ‘सूर्यदत्त महा मिसळ’ उपक्रमातून सात तासात ३० व्यक्तींच्या मदतीने सात हजार किलो मिसळ बनवून तीन तासात ३०० सामाजिक संस्थामार्फत ३० हजार लोकांना ती मिसळ वाटण्याचा अनोखा जागतिक विक्रम केला आहे.
याचबरोबर विक्रमी वेळेत ऊर्जा प्रदान करणारी चिक्की बनविणे, उपवास करणाऱ्या भक्तांकरिता शाबूची खिचडी बनविणे आणि ती स्वयंसेवकांमार्फत लोकांना वितरित करणे याबरोबरच ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थ्यांनी सलग २४ तास प्रबोधनासाठी लेखन, वाचन, विचार करणे, शिकणे, मौन पाळणे, नवकल्पनांचे आविष्कार, संशोधन व इनोव्हेशन असा एकत्रित उपक्रम केला असून, त्याचीही नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झालेली आहे, असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
कालानुरूप व उद्योजकीय कौशल्ये विकसित करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भावना रुजविणे ही हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट संस्थेची व्यावसायिक आणि नैतिक जबाबदारी आहे. सूर्यदत्त त्यादिशेने काम करत आहे.
हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सूर्यदत्त संस्थेला भेट देऊन येथील दर्जेदार शिक्षणाचा अनुभव घ्यावा असे आवाहन प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.
