तीन अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शाळेतून घरी पायी जात असताना एकाच्या बहिणीविषयी अश्लिल बोलल्याने तिघा अल्पवयीन मुलांनी १५ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत १५ वर्षाच्या मुलाच्या वडिलांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील टिळेकरनगर येथील आकृती सोसायटीजवळ बुधवारी सकाळी ८ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा शाळेतून घरी पायी चालत येत होता. आरोपी मुलांपैकी एकाच्या बहिणीविषयी अश्लिल बोलला होता. त्या कारणावरुन तिघांपैकी एकाने रस्त्यात पडलेला दगड फिर्यादींच्या १५ वर्षाच्या मुलाच्या डोक्यात घातला.
इतर दोघांनी मुलाला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करीत आहेत.

 
			


















