भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करून १८,५८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात ८,५८,०००/- रुपयांचा गुटखा आणि १० लाख रुपये किंमतीचे दोन टेम्पोचा समावेश आहे.
दि. २० डिसेंबर २०२४ रोजी स्वारगेट पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संजय भापकर यांना फालेनगर, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील यांना दिली.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने फालेनगर, लेन नंबर ५ येथील राजन प्रोव्हिजन स्टोअरजवळ सापळा रचला. त्याठिकाणी सौरभ ऊर्फ धनराज रामकृष्ण निंबाळकर (वय २४, रा. श्रीराम सोसायटी, थोरवे शाळेसमोर) व संग्राम रामकृष्ण निंबाळकर (वय २६, रा. श्रीराम सोसायटी, थोरवे शाळेसमोर) हे दोघे टेम्पोतून विक्रीसाठी प्रतिबंधित विमल पान मसाला गुटखा बाळगताना आढळून आले.
त्यांच्या ताब्यातून ८,५८,०००/- रुपयांचा गुटखा व १० लाख रुपये किंमतीचे दोन टेम्पो असा एकूण १८,५८,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, आणि मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पथकाचे पोलीस अधिकारी सपोनि संतोष कोळी, पोलीस अंमलदार संजय भापकर, राहुल तांबे, कुंदन शिंदे, सागर केकाण, निलेश मोकाशी, महेश बारवकर आणि मितेश चौरमोले यांनी या कामगिरीत मोलाचे योगदान दिले.
