महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांना भारतातील सर्व जैन स्थानकांवरील कर कायमस्वरूपी माफ करण्यासाठी निवेदन देण्यात आले. श्रीरंग बारणे यांनी निवेदनाची दखल घेत या विषयावर पुढील पावले उचलण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी देवेंद्र पारख, राजेंद्र दुगड उपस्थित होते.
