टायटल स्पॉन्सर : ऋषभ दुगड : मीडिया पार्टनर : महाराष्ट्र न्युज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : न्यू व्हेन्चर क्रिकेट लीग (NVCL) सीझन-01 अंतर्गत भव्य लिलाव कार्यक्रम नुकताच २९ डिसेंबर रोजी हॉटेल टीआमो कोंढवा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. १९ जानेवारी २०२५ ला ही स्पर्धा होणार आहे. सर्व सामने दुपारी ३ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत खेळवले जाणार आहेत.
या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर: ऋषभ दुगड (दुगड ग्रुप) असून, मेडिकल किट स्पॉन्सर : उमेश ओस्तवाल (जय हेल्थकेअर), मीडिया पार्टनर : अभिजीत डुंगरवाल (महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) आणि डिजिटल पार्टनर : नितीन चोपडा (यश क्रिएशन) हे आहेत.
या स्पर्धेमध्ये सहा टीम असून प्रत्तेक टीम मध्ये 7 खेळाडू असणार आहेत. यामध्ये संघ मालक Thala’s 7 – आरव अग्रवाल, Psquare Achievers – फ्रेश प्राश ग्रुप, JB’s Match Winners – जिनेश भंडारी, Hotshot Hitters – मानव नाईक, Magic Mentors – शुभम अग्रवाल, Gladiator Namo Sangrams – अनुज बोरा हे आहेत.
या लीगचे आयोजन Nvcl चे संस्थापक परेश ओस्तवाल, आनंद अग्रवाल, आणि जिग्नेश बंबोली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील व्यावसायिक मित्रांना एकत्र आणत एकसंधता निर्माण करणे, हा या आयोजकांचा मुख्य उद्देश आहे.
