प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या नेमणुका
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर पोलीस दलातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात असून, त्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आहेत.
बदल्यांचे सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे –
विठ्ठल दिगंबर दबडे (विशेष शाखा १) यांची बदली खडकी विभागात
अनुजा अजित देशमाने (खडकी विभाग) यांची बदली फरासखाना विभागात
अनुराधा विठ्ठल उदमले (विशेष शाखा २) यांची बदली हडपसर विभागात
नूतन विश्वनाथ पवार (फरासखाना विभाग) यांची बदली विशेष शाखा २ मध्ये
अतुलकुमार यशवंत नवगिरे (वाहतूक शाखा) यांची बदली विशेष शाखा १ मध्ये
अश्विनी गणेश राख (हडपसर विभाग) यांची बदली वाहतूक शाखेत
ही प्रशासकीय बदल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असून, कार्यभार तत्काळ स्वीकारण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
