स्वत:चे मोबाईलवरील स्कॅनर ग्राहकांना देऊन केली फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पेट्रोल पंपावरील गॅस स्टेशनवर येणाºया वाहनचालकांना स्वत:चा स्कॅनर देऊन तसेच लॉकरमधील रोख रक्कम काढून घेऊन पेट्रोल पंपावरील कामगार दीड लाखांचा अपहार करुन पळून गेला आहे.
याबाबत संदिप आनंदा हांडे (वय ३३,रा. वानवडी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ऋषिकेश गहाळे (वय २६, रा. पारी कंपनी चौक, धायरी रोड, नर्हे, मुळ रा. अकोला) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार धायरी रोडवरील युवांश गॅस स्टेशन येथे २७ फेब्रुवारी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप हांडे हे मॅनेजर असून त्यांच्या कार्यालयात दोन लॉकर आहेत.
तीन शिफ्टमध्ये तेथे काम चालते. कामगार एका लॉकरमध्ये शिफ्टनुसार पैसे ठेवतात. २७ फेब्रुवारी रोजी त्यांनी लॉकरमध्ये पैसे ठेवले होते. २८ फेब्रुवारीला लॉकर उघडला तर त्यात दुसर्या कामगारांच्या हिशोबातील २६ हजार रुपये नव्हते.
सेंकड शिफ्टमधील कामगार ऋषिकेश गहाळे याला फोन केल्यावर त्याचा मोबाईल बंद लागला. घरी जाऊन पाहिल्यावर ते बंद होते़. त्यानंतर त्यांनी तपासणी केली. त्यात ऋषिकेश गहाळे याने दुसर्या शिफ्टमध्ये दुपारी २ ते रात्री १० पर्यंत गॅस विक्री केलेली ऑनलाईन वर न घेता स्वत:चे फोनवरील स्कॅनर वर घेतलेली असल्याचे लक्षात आले.
ती एकूण १ लाख २९ हजार ९३८रुपये होती़ असे एकूण १ लाख ५२ हजार ९३८ रुपये घेऊन तो पळून गेला आहे. पोलीस हवालदार प्रकाश पाटील तपास करीत आहेत.
