मार्केटयार्ड परिसरात माजविली होती दहशत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केटयार्ड परिसरात दहशत माजविणार्या कुख्यात गुंडाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
फहीम फिरोज खान (वय २०, रा. गल्ली नंबर १९, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे या गुंडाचे नाव आहे. फहीम खान याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. मार्केट यार्ड परिसरात त्याची दहशत आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास कोणी पुढे येत नव्हते. त्यामुळे त्याला तडीपार करण्यात आले होते़ तडीपार असतानाही तो ऑगस्ट २०२३ मध्ये शहरात आला.
आंबेडकरनगर परिसरात तो हातात कोयता घेऊन परिसरात दहशत माजवत होता. त्याची गुन्हेगारी कृत्य थांबत नसल्याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी कट्टे, चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर, पोलीस अंमलदार अमरनाथ लोणकर, समीर चव्हाण, राजेश थोरात, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, आशिष यादव, संदीप सूर्यवंशी यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची पडताळणी केली. फहीम खान याला एक वषार्साठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
