पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ दुगड ग्रुप व निर्झरा ग्रुपच्या वतीने सलग पाचव्या वर्षी आयोजित भव्य रक्तदान शिबिराला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल 1008 बाटल्या रक्त संकलित करून नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली.
हे रक्तदान शिबिर आदिनाथ जैन स्थानक, पुणे येथे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत पार पडले. डॉ. विजय सेटिया यांच्या विशेष सहकार्याने 6 ब्लड बँकांमध्ये रक्त संकलित करण्यात आले. या उपक्रमात रवींद्र दुगड, ऋषभ दुगड व दुगड परिवाराच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या शिबिराच्या आयोजनात आर. जी. हेल्पिंग हॅंड्स, कुमुद ग्रुप, NVCL ग्रुप, The Wholesome Bowl, Love Care Share Foundation, फ्लेम्स ग्रुप, सिद्धार्थ हॉस्पिटल्स, आनंद दर्शन युवा मंच, जितो, गौतम निधी फाउंडेशन, जिजाऊ युवा मंच पुणे, युगल धर्म सेवा संघ पुणे, दिव्यांश जैन ग्रुप, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप पुणे परिवार, आय सोशल, द सोशल युवा क्लब, एफटीएन फाउंडेशन, जैन सोशल ग्रुप्स, एम स्क्वेअर प्रमोशन्स, सहाय्यता, सॅलिसबरी, गौतमलब्धी फाउंडेशन, एलेमेंट्स, डिव्हाईन जैन ग्रुप (ट्रस्ट), न्यू व्हेंचर क्रिकेट लीग, अशोक टायर्स, साकुरा, सुनयना ऑप्टिक्स पुणे, कॅफे ब्लेंड यांनी मोठा सहभाग घेतला.
हे या शिबिराचे पाचवे वर्ष होते. यामध्ये उद्योगपती प्रकाश धारिवाल, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने, बाबाशेठ मिसाळ, सुनील रासने, धीरज घाटे, मानसी देशपांडे, प्रवीण चोरबेले, मनोज देशपांडे, राहुल भंडारे, आप्पा रेणूसे, दीपक पोटे, पुणे मर्चंट चेंबरचे सर्व पदाधिकारी, जीतो पुणेचे अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड, लक्ष्मीकांत खाबिया, रवींद्र सांकला, राजेश सांकला, सुनील नहार, अनिल नहार, महावीर नहार, डॉ. अजय कोठारी, डॉ. मिलिंद दुगड, राजेशभाई शहा, बाळासाहेब धोका, गणेश ओसवाल यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक रक्तदान शिबिराद्वारे 1008 बाटल्या रक्त पुणे शहरासाठी संकलित करण्यात आल्या. हिरालालजी दुगड यांना श्रद्धांजली अर्पण करत, उपस्थित मान्यवरांनी अशा उपक्रमांचे भविष्यातही आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
“हा उपक्रम केवळ रक्तदान करण्याचा नव्हे, तर समाजासाठी योगदान देण्याच्या आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा आम्ही निश्चय केला आहे. – रवींद्र दुगड
