अल्पवयीन असल्यापासून गुन्हेगारी : सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : अल्पवयीन असताना खुनाचा प्रयत्नासह ३ गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून सिंहगड रोड पोलिसांनी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुस जप्त केले आहे.
सोमनाथ भिमा चांदणे (वय २१, रा. वडगाव पठार, वडगाव बुद्रुक) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तो अल्पवयीन असताना खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यास त्याच्यावर तीन गुन्हे दाखल होते. सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, विनायक मोहिते यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सोमा चांदणे याच्याकडे गावठी पिस्तुल असून तो कुदळे याचे पत्र्याचे शेडजवळ उभा आहे.
त्यानुसार पोलीस पथक तेथे पोहचले. त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करता सोमनाथ चांदणे तेथे उभा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपयांचे एक गावठी पिस्टल व २ हजार रुपयांचे दोन जिवंत काडतुसे मिळून आली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, राहुल ओलेकर, अमोल पाटील, विनायक मोहिते, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडुळे, विकास बांदल, गणेश झगडे, निलेश भोरडे यांनी केली.
