आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फ्रॉड ट्रान्झॅक्शन झाल्यास तीन दिवसात बँकेला कळवा

Spread the love

पुणे : ग्राहकांना बँकांनी उत्तम सेवा द्यावी, या करीता रिझर्व्ह बँकेन काही नियम केले आहेत. बँक ग्राहकांनी हे नियम समजावून घेतले तर ग्राहकांना आपले हक्क अबाधित ठेवता येतील. एखादे फ्रॉड ट्रान्झॅक्शन झाले असेल आणि ते ग्राहकाने तीन कामकाजाच्या दिवसात बँकेच्या निदर्शनास आणून दिले तर झालेल्या नुकसानीची जबाबदारी पूर्णपणे बँकेची असेल.

या संदर्भात रिझर्व्ह बँकेने ६ जुलै २०१७ रोजी परिपत्रक काढले आहे. हे परिपत्रक अतिशय महत्वाचे आहे. त्यातून सायबर क्राईममध्ये झालेल्या नुकसानीची रक्कम बँकेला ग्राहकाला परत करावी लागेल. हे अनेकांना माहिती नसल्याने ग्राहकांचे नुकसान होत असते.

ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना नियम घालून दिले आहेत. ते नियम डावलून अनेक बँकांचा स्वत:च्या सोयीच्या दृष्टीने व्यवहार सुरु असतो. हे महत्वाचे नियम सर्व ग्राहकांना माहिती असले पाहिजे.