पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांची धडाकेबाज कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहराच्या वाढत्या परिसरात उपनगरामधील वाढलेले गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी एकाचवेळी रेकॉर्डवरील १० सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे.
फिरोज महंमद शेख (वय २९, रा. घोरपडे वस्ती, कदमवाक वस्ती, ता. हवेली) प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (वय २० रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली, सध्या रा. लोणी स्टेशन) चंद्रशेखर ऊर्फ चंद्रकांत ऊर्फ पिल्या दाजी चोरमोले (चोरमले) (वय २३, रा. गायकवाड चाळ, माळीमळा, लोणी काळभोर. अजय दीपक जाधव (वय ३५, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) हनुमंत ऊर्फ बापू दगडु सरोदे (वय ४८, रा. कॅनॉल शेजारी, भीमनगर, मुंढवा) साहिल राजू साठे (वय १९, रा. केशवनगर, मुंढवा) वसीम सलीम पटेल (वय ४०, रा. पटेल क्लासिक, साईबाबानगर, कोंढवा खुर्द, मुळ रा. दांडेकर पुल) वसीम ऊर्फ वस्सु शकील खान (वय २५, रा. भाग्योदयनगर, मुबारक मंजिल, कोंढवा) ओंकार शिवानंद स्वामी (वय २३, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) आदिराज मनोज कामठे (वय २१, रा. भागीरथीनगर, साडेसतरानगळी रोड, हडपसर) याच्यावर जबरी चोरी, मारहाण, धमकावणे, दुखापत करणे, हत्यार जवळ बाळगणे यासारखे ३ गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
तीन महिन्यात ५१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई
२०२५ मधील पहिल्या तीन महिन्यात परिमंडळ ५ मधील ९ सराईत गुन्हेगारांवर एम पी डीए प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच ३ मोका कारवाईमध्ये २१ गुन्हेगार जेरबंद करण्यात आले आहे. आजपर्यंत ११ गुन्हेगार तडीपार करण्यात आले आहेत़ मागील १०० दिवसात ५१ सराईत गुन्हेगारांवर परिणामकारक कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.
