नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहण व प्रतिमापूजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम : विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
भीमनगर येथील सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भीम जन्मोत्सव सोहळ्यात नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून अभिवादन केले.
यावेळी समितीच्या वतीने नानांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर महावितरण कार्यालय, लक्ष्मी नगर, इंदिरा नगर तसेच लखन भालेराव यांच्या घरासमोरील बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. या दौऱ्यात इंदिरा नगर येथील निळा झेंडा चौक फलकाचे अनावरण देखील नगराध्यक्षांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल, आर.पी.आय.चे मराठवाडा उपाध्यक्ष भागवत शिंदे, माजी नगराध्यक्ष संजय शिंदे, माजी नगरसेवक रोहन जाधव, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष झुंबर गायकवाड, उपाध्यक्ष कुंदन शिंदे, सुनील थोरात, प्रदीप कांबळे सर, पत्रकार अब्बास सय्यद, शाम वारे, इंदिरा नगर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष वैभव गायकवाड, उपाध्यक्ष राहुल गायकवाड, अमोल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
