चोरी प्रकरणात २४ तासांत अटक : ४४,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहरातील मार्केट यार्ड परिसरात घडलेल्या चोरीच्या घटनेत गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या २४ तासांत अट्टल गुन्हेगारास अटक करून ४४,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३०/२०२५ भादंवि कलम ३०३(२) नुसार दाखल गुन्ह्यातील फिर्यादी निलेश सुभाष साखरे (वय ३४, व्यवसाय – व्यापारी, जात – लिंगायत वाणी, रा. सुभाष नगर, बार्शी) हे मार्केटयार्ड बार्शी येथील प्लॉट नं. १३० मध्ये सुभाष उत्तरेश्वर साखरे जनरल मर्चंट अॅण्ड कमिशन एजंट या नावाने आडत व्यवसाय करतात.
फिर्यादी यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला शेतमाल दुकानासमोर कठड्यावर उघड्यावर ठेवला होता. दि. १९/०४/२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते ०५/०५/२०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुकानासमोरील एकूण १४ पोती ज्वारी, ७ पोती सोयाबीन, ४ पोती पांढरी तूर व १ पोते हरभरा असा एकूण ४४,८०० रुपये किमतीचा शेतमाल चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला शोधकार्याचे आदेश दिले. पोउनि उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने तपास करत असताना पोहेकॉ श्रीमंत खराडे यांना गुन्हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपीने याआधी देखील हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली.
यावरून आरोपी अविनाश ज्ञानदेव आदाते (वय २३, रा. बार्शी) यास ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत त्याच्याकडून चोरीस गेलेला सर्व शेतमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपीविरुद्ध यापूर्वीही बार्शी शहर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ श्रीमंत खराडे, अमोल माने, बाळकृष्ण दबडे, बाबासाहेब घाडगे, पोना संगप्पा मुळे, पोकॉ अंकुश जाधव, धनराज फत्तेपुरे, सचिन देशमुख, राहुल उदार, सचिन नितनात, अविनाश पवार, प्रल्हाद अकुलवार, इसामिया बहिरे, रतन जाधव यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ श्रीमंत खराडे करीत आहेत.
