• महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
Friday, April 24, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

पीएसआय आणि अंमलदारांना शिक्षा

May 7, 2025
0
7 5 25 2
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

पोलीस आयुक्तांचा कारवाईचा मेसेज हुक्का पार्लर चालकांना पाठवून केले होते सावध

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : हुक्का पार्लरवर होणाऱ्या कारवाईची माहिती पुढे पोहोचवल्याप्रकरणी परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस अंमलदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईपूर्वीच पार्लर चालकांना मेसेज पाठवून सतर्क केले होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील ११ ठिकाणी हुक्का पार्लरवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, हा आदेश काही अधिकाऱ्यांनी पार्लर चालकांना पाठवून त्यांना आधीच सावध केले. त्यामुळे कारवाईच्या वेळी काही ठिकाणी हुक्का सेवा बंद करण्यात आली होती.

परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक विशाल शिवाजी पवार आणि पोलीस अंमलदार हरिचंद्र राजाराम पवार यांची नावे पुढे आली आहेत. या दोघांवर सध्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
विशाल पवार यांना सेवेतून बडतर्फ का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यांनी दिलेला खुलासा अंशतः समाधानकारक असल्यामुळे त्यांच्या प्रस्तावित शिक्षेमध्ये सवलत देऊन ५ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात आली आहे.

२६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री वानवडी, कोंढवा, काळेपडळ, लष्कर, कोरेगाव पार्क आणि विमाननगर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती मिळाली होती.
पोलीस आयुक्तांनी ११ ठिकाणांची नावे नमूद केलेला मेसेज अधिकाऱ्यांना पाठवून कारवाईचे आदेश दिले.

मात्र, विशाल पवार हे प्रशिक्षणासाठी रामटेकडी येथे असतानाही त्यांनी हा मेसेज विजेता हॉटेलचे मालक राहुल सुरेखा जैनसिंघाल यांना पाठवला. त्यामुळे राहुल जैनसिंघाल यांनी हुक्का सेवा बंद करताना पोलिसांनी कारवाई केली.

चौकशीत राहुल जैनसिंघाल यांनी कबुली दिली की, विशाल पवार यांना ते महिन्याला २० हजार रुपये देत होते. पोलीस मार्शल हरिचंद्र पवार यांनीही जैनसिंघाल यांना फोन करून सावध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी फोन उचलला नव्हता.

हरिचंद्र पवार यांना वार्षिक वेतनवाढ स्थगित करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. त्यांच्या खुलाशाही अंशतः समाधानकारक आढळल्याने त्यांनाही ५ हजार रुपये दंडाची शिक्षा करण्यात आली. हे आदेश अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिले.

May 20257

Latest Articles

तोतया पोलिसाने नोकरीच्या अमिषाने घातला गंडा

तोतया पोलिसाने नोकरीच्या अमिषाने घातला गंडा

April 24, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

April 24, 2026

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

April 24, 2026
अल्पवयीनाकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

अल्पवयीनाकडून गावठी पिस्टल, जिवंत काडतूस जप्त

April 24, 2026
‘ऑपरेशन फ्लश आऊट’मध्ये १२ दिवसांत १६६ गुन्हे दाखल

वशीकरणाचे प्रयोग करणाऱ्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

April 24, 2026
Load More
Previous Post

जीतो JBN पुणे मीट में 1.18 करोड़ का बिजनेस

Next Post

शेअर ट्रेडिंगमध्ये जादा नफ्याचे आमिष दाखवून घातला २६ लाखांचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT USAddress :

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta