गुणवंत विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी; पोदार पॅटर्नच्या यशस्वीतेचा लौकिक अधोरेखित
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : पोदार लर्न स्कूल, बार्शीने यंदाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत, गुणवत्तेची उजळण पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शाळेतील सर्व 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण प्राप्त केले आहेत.
शाळेतील उदयन नितीन गायकवाड याने 98.00% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. अक्षरा दत्ताबळ पाटील हिने 96.00% गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर वेदांत सुधीर काशीद याने 95.80% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
90% पेक्षा अधिक गुण मिळवलेले विद्यार्थी 16 , 80% ते 90% गुण मिळवलेले विद्यार्थी 16, 75% ते 80% गुण मिळवलेले विद्यार्थी – 2 या यशामागे शाळेचा विशेष ‘पोदार पॅटर्न’ अभ्यासक्रम आहे.
सातत्यपूर्ण सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन, अभ्यासातील शिस्त आणि शिक्षकांचा प्रभावी सहभाग हे घटक विद्यार्थ्यांच्या घडणीत निर्णायक ठरले. शाळेचे प्राचार्य श्री. रविराज बेलुरे यांनी सांगितले की, “गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला उंच भरारी देता येते, हे या निकालातून स्पष्ट होते.”
या अपूर्व यशाबद्दल शाळेच्या अध्यक्षा वैशाली कबाडे, सचिव संदीप बर्डे, प्राचार्य रविराज बेलुरे, तसेच संपूर्ण शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
पोदार लर्न स्कूल, बार्शी ही संस्था गुणवत्ता, शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असल्यामुळे, बार्शी परिसरातील पालकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरली आहे.
