छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुक्या जनावरांसाठी सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने ‘जाणीव फाउंडेशन गोशाळा, बार्शी’ येथे मुक्या जनावरांसाठी एक लाख एक हजार एक रुपयांचा चारा वाटप करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात माऊली समूहाचे संस्थापक अध्यक्ष अमृत नाना राऊत यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली. सूत्रसंचालन वसंत मामा हवालदार यांनी केले.
संस्थेच्या कार्याचा प्रास्ताविक आढावा प्रा. चंद्रकांत उलभगत यांनी घेतला आणि आजपर्यंतच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. संतोष पवार यांनी संस्थेच्या कार्याचे कवितारूप सादरीकरण केले.
संस्थेच्या महिला अध्यक्षा सायरा मुल्ला यांनी चारा वाटपाबाबत आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांनी गेल्या काही महिन्यांतील कार्याचा आढावा घेत पुढील उपक्रमांची माहिती दिली.
दोन महिन्यांपूर्वी वसंत मामा हवालदार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अमृत नाना राऊत यांनी ओन्ली समाजसेवा व जाणीव फाउंडेशनच्या सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्याचे कौतुक करत आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
त्यांना जाणीव फाउंडेशनच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांमध्ये राहुल वाणी, संतोष शेळगावकर, नागनाथ सोनवणे, माणकोजी ताकभाते, प्रा. रतिकांत हमने, प्रा. सचिन मस्के, गणेश कदम, अतुल वाणी, सुरेंद्र स्वामी, वृक्षमित्र केदार वळेकर, संपतराव देशमुख, विजय मामा येवारे, सायरा मुल्ला, रेखा विधाते, रागिनी झेंडे, सुजाता अंधारे, अनुसया आगलावे, त्रिशाला मिसाळ, सुनिता गायकवाड, तुळशीदास मस्के, राजाभाऊ लोहार, संतोष पवार, किशोर अकोसकर, दीपक नाना शिंदे व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी तुळशीदास मस्के सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. ओन्ली समाजसेवेने दिलेल्या आर्थिक मदतीचे विशेष कौतुक करण्यात आले. संस्थेला आर्थिक पाठबळ दिलेल्या सर्व मित्रपरिवाराचे आभार संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी मानले व पुढील उपक्रमांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले.
