• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, June 19, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

’जॉन डिअर’ने महाराष्ट्रात स्मार्ट मशिन्स तयार करून जगात निर्यात करावे : देवेंद्र फडणवीस

June 9, 2025
0
9 6 25 4 2
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या सणसवाडी प्रकल्पाचे उद्घाटन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क

पुणे : ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ धोरणांचा अवलंब करणाऱ्या जॉन डिअरच्या नव्या प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने कृषी क्षेत्राला नवसंजीवनी. जॉन डिअर इंडियाच्या पुण्यातील सणसवाडी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, “जॉन डिअरने महाराष्ट्रात तयार होणाऱ्या स्मार्ट मशिन्सचे उत्पादन वाढवून, त्या जगभर निर्यात कराव्यात. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे साधन ठरावे,” असे आवाहन केले.

शिरुर औद्योगिक वसाहत क्षेत्रात जॉन डिअर इंटेलिजेंट सोल्युशन्सच्या सणसवाडी प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त दीपक सिंगला, पोलीस अधिक्षक संदीप गिल, राजेश सिन्हा, मुकुल वासने, देवेंद्र बहीरट आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रासह भारत आणि पूर्ण जगात जॉन डिअरने आपले मूल्य कायम ठेवत प्रगती साधली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हवामान बदलाल्या काळात कृषी क्षेत्रावर परिणाम होत आहे.

जॉन डिअरसारख्या उद्योगसंस्था नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून चांगले कार्य करीत आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेचा कृषी क्षेत्रातही उपयोग सुरू झाला असून कृषी प्रक्रीयेत अनुकूल बदल घडवून उत्पादनात गुणात्मक बदल घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत आहे. कृषी क्षेत्रात त्यामुळे खूप चांगले बदल घडून येतील.

नुकत्याच पुणे येथे झालेल्या कृषी हॅकॅथॉनमध्ये अनेक चांगल्या कल्पनापुढे आल्या. या कल्पनांना उत्पादनात बदलून ही उन्नत तंत्रज्ञानाची क्रांती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता जॉन डिअरमध्ये आहे.

उद्योगसंस्थेला बाजारातील महत्व कायम ठेवण्यासाठी नाविन्याचा शोध घ्यावा लागतो आणि जॉन डिअर त्यात आघाडीवर आहे. जॉन डिअरने स्मार्ट मशिन्सची ही क्रांती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी आणि स्मार्ट मशिन्स इथे तयार करून जगात निर्यात करावेत.

महाराष्ट्रात संस्थेच्या विस्तारात राज्य शासन सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. जॉन डिअरकडून शेतकऱ्यांसाठी चांगले तंत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे. अन्य क्षेत्राच्या तुलनेत कृषी क्षेत्रात उन्नत तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची जास्त गरज आहे.

यामुळे शेतीच्या परंपरागत पद्धतीच्या कामात बदल होईल, शेतीच्या कामात अधिक अचूकता येईल आणि हे तंत्रज्ञान उत्पादन, उत्पादकता यावर परिणाम करणारे असेल. आणि जॉन डिअर इंडियाच्या केंद्रस्थानी याच बाबी आहेत.

पेरणीपासून कापणी पश्चात कृषी प्रक्रीयेपर्यत संपूर्ण कृषीकार्यात जॉन डिअरने चांगले तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे, असे मुख्यमंत्री म्हणले. राजेश सिन्हा यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची माहिती दिली.

महाराष्ट्रात उद्योगांसाठी चांगले वातावरण असल्याने जॉन डिअर इंडियाने राज्यात पाचवी मोठी गुंतवणूक केली आहे. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून चांगले उत्पादन करण्यात शेतकऱ्यांना नव्या प्रकल्पामुळे मदत होणार आहे.

गेल्या सात वर्षात कृषी आणि रस्ते निर्माण क्षेत्रात जॉन डिअरने भारतात योगदान दिले आहे. पुणे येथे होणारे उत्पादन पुर्णत: भारतात निर्मित असल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जॉन डिअर इंडियाच्या नव्या प्रकल्पाची पाहणी केली आणि माहिती घेतली.

७० टक्के महिलांना रोजगार देण्याच्या धोरणामुळे जॉन डिअर संस्था यशस्वी ठरत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’, ‘डिझाईन इन इंडीया’ आणि ‘मेक फॉर द वर्ल्ड’ या तिन्ही गोष्टी जॉन डिअर इंडियाने अनुसरल्या आहेत. राज्यातून ९ देशात निर्यात केली जात आहे. संस्थेचा ८० टक्के महसूल हा निर्यातीतून मिळत आहे. डिझाईनींगच्या क्षेत्रात भारतात त्यासाठी आवश्यक गुणवत्ता उपलब्ध आहे. जॉन डिअरकडून उत्पादनाचे डिझाईनींग आणि प्रमाणिकरण इथे होत आहे. या दोन बाबी प्रत्येक उद्योगासाठी महत्वाच्या आहेत. संस्था या दोन्ही गोष्टी इथेच करीत असल्याने ती खऱ्या अर्थाने भारतीय आणि महाराष्ट्रातील संस्था आहे. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

111

Latest Articles

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025
Load More
Previous Post

शिवछत्रपतींच्या वारशाचा जागर करणाऱ्या सांस्कृतिक आणि गौरवशाली यात्रेचा शुभारंभ !

Next Post

विवाहितेची दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

पालखीचे लोकेशन करणार घरबसल्या

June 19, 2025
गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

गंगाधाम चौक परिसरात जड वाहनांना २४ तास मनाई

June 19, 2025
जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

जांभुळवाडी तलावावर तरुणाचा निर्घृण खून

June 18, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025
विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

विद्यार्थ्यांची ‘आधार’ चॅरिटेबल आश्रमला भावनिक भेट

June 19, 2025
विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

विजयकांत कोठारी को “श्रमण संघरत्न” पुरस्कार से सम्मानित

June 19, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

महिलेची ६ वर्षांच्या मुलासह टेरेसवरून उडी मारून आत्महत्या

June 19, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 19, 2025
तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

तडीपार आदेशाचे उल्लंघन करणारा गुन्हेगार कोथरूडमध्ये जेरबंद

June 19, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta