तीन गुन्हे निरीक्षकांना बढती : शहरातील ४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : दि. २४ जुन २०२५ : वाहतूक शाखेबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. टोइंग वाहनांवरील कर्मचार्यांच्या मनमानीविषयीही वाहनचालकांकडून असंख्य तक्रारी करण्यात येत होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहतूक शाखेतील ८ पोलीस निरीक्षकांची बदली केली आहे.
तसेच, तीन गुन्हे पोलीस निरीक्षकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करण्याची संधी देण्यात आली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दोन गुन्हे निरीक्षकांचीही बदली करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेत तात्पुरती बदली करण्यात आलेल्या ९ पोलीस निरीक्षकांची बदली कायम करण्यात आली आहे. अंजुम बागवान, भाऊसाहेब पाटील, संदिप भोसले, स्मीता वासनिक, प्रशांत अन्नछत्रे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये प्रदीप कसबे, उत्तम नामवाडे, अशोक इप्पर, प्रकाश धेंडे बदली कायम करण्यात आली आहे.
