नांदेड सिटी पोलिसांची कारवाई : दोघांना अटक, दोन चोरीच्या दुचाकी जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सिंहगड रोड भागातील धायरीतून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ओंकार संतोष सातपुते (वय २०, रा. लायगुडे वस्ती, धायरी) आणि साईराज अतुल तावरे (वय १८, रा. कांबळे वस्ती, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. धायरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या होत्या.
याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरट्यांच्या मागावर पोलिसांचे पथक होते. पोलीस अंमलदार मोहन मिसाळ व शिवा क्षीरसागर यांना या दुचाकी चोरट्यांविषयी माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस अंमलदार मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, राजू वेगरे, उत्तम शिंदे, स्वप्नील मगर, निलेश कुलथे, भिमराज गागुर्डे, प्रतिक मोरे, अक्षय जाधव, संग्राम शिनगारे, सुदाम वावरे आणि सतिश खोत यांनी केली.
