जुन्या आठवणींना उजाळा, गुरुजनांचा सन्मान, एकमेकांशी दिलखुलास गप्पांचा माहोल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : रवींद्र हायस्कूल, भूम येथील इयत्ता १०वी (१९८८-८९) च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन जुन्या आठवणींना उजाळा देत, उत्साही वातावरणात संपन्न झाले. रविवार, दिनांक २७ रोजी संत श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
स्नेहसंमेलनाचा प्रारंभ सकाळी ९ वाजता सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेस सदिच्छा भेट देऊन केला. यावेळी शाळेच्या आवारातच अल्पोपहार घेत एकमेकांशी दिलखुलास गप्पा रंगल्या. गप्पांचा विषय प्रापंचिक जीवनावर केंद्रित होता, आणि त्यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक सहभाग दिसून आला. विशेष म्हणजे त्याकाळच्या अनेक विद्यार्थिनींचीही लक्षणीय उपस्थिती होती.
मुख्य कार्यक्रम सकाळी १० वाजता श्री गजानन महाराज मंदिराच्या सभागृहात सुरू झाला. सकाळी १० ते १ या वेळेत स्वागत समारंभ पार पडला. दुपारी १ ते २ भोजन, त्यानंतर २ ते ४ या वेळेत एकमेकांचा परिचय आणि मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाची सांगता दुपारी ४ ते ५ दरम्यान आभार प्रदर्शन, छायाचित्रण आणि निरोप समारंभाने झाली.
कार्यक्रमात माजी शिक्षकांचा सत्कार सोहळा विशेष आकर्षण ठरला. तत्कालीन शिक्षक सुभाष साठे, मोहन सलगर, श्रीधर वाघमारे, एन. आर. वारे, नामदेव शेंडगे, भाऊसाहेब जगदाळे, होनराव, कवाळे आणि उगलमुगले यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी भूम नगरपालिकेचे माजी गटनेते संजय गाढवे, डॉ. विजयकुमार सूळ, सुनीलकुमार डुंगरवाल, बाळासाहेब निकाळजे, महादेव मनगिरे, जयेंद्र मैदर्गे, सोमनाथ पुरी, प्रदीप निकाळजे, नवनाथ सोनवणे, हरी कदम, राजाराम कदम, रवींद्र सम्राट, मोहन घोरपडे, संजय जगदाळे, महेश तांबोळकर, संदीप माने, धैर्यशील जाधव, प्रदीप नाईकवाडी, विक्रम बनसोडे, सुरेश बागल, विजय मनसुके, अरुण सोनटक्के, रेवण वारे, मोहन गाडे, विनोद कुलकर्णी, विजय रेपाळ, प्रभाकर शेळके, सुदाम गुंजाळ, बालाजी शिर्के, चंद्रकांत गाढवे, किशोर वेदपाठक, गजेंद्र चौधरी, संजय बनसोडे, बाळासाहेब कदम, राजेंद्र शेळके, पवन विधाते, अमीनुल्ला पठाण, धन्यकुमार लोखंडे, अशोक साबळे, कमलाकर मुसांडे, श्रीकांत राऊत, दत्ता गवळी, गणेश लांडे, मोहन पाटुळे, सुखदेव शेळके तसेच विद्यार्थिनींमध्ये श्रीमती छाया अंधारे, सुनीता कराळे, मनीषा मराठे, अर्चना भिंगारे, बेबी विधाते यांसह अनेक जण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन बाळासाहेब निकाळजे यांनी केले, तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी सुनीलकुमार डुंगरवाल यांनी पार पाडली. संपूर्ण दिवस जुन्या आठवणींना उजाळा देत, हर्षोल्हासात साजरा करण्यात आला आणि सर्वांनी पुन्हा भेटीची आशा व्यक्त करत एकमेकांचा निरोप घेतला.
