जय आनंद ग्रुप व गौतम निधी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : आचार्य सम्राट श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या १२६व्या जन्मजयंतीनिमित्त पुण्यातील श्री वर्धमान संस्कृती केंद्र, कोंढवा येथे जय आनंद ग्रुप आणि गौतम निधी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाला समाजबांधवांचा भरभरून प्रतिसाद लाभला असून तब्बल ३९१ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवसेवेचा अनमोल संदेश दिला. या शिबिरात रक्त संकलनाचे कार्य आचार्य आनंदऋषीजी ब्लड बँक पुणे शाखा, अहिल्यानगर शाखा आणि पी. एस. ब्लड बँक यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.
शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांचे उत्स्फूर्त मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम प्रसंगी राजकुमार लोढा, महावीर लोढा, नितीन ओस्तवाल, गणेश कटारिया, आनंद कोठारी, दिलीप धोका, प्रवीण चोरबेले, अशोक लोढा, अनिल लुंकड, गौतम नाबरिया, संतोष भुरट, राजेंद्र सुराणा, रमन कोठारी, शांतिलाल देसर्डा, शाम कर्नावट, प्रकाश गांधी, संतोष कर्नावट, प्रवीण तालेडा, विजय पारख, किशोर छाजेड, शांतीलाल नवलखा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या यशस्वी उपक्रमाच्या माध्यमातून पुणे शहरात रक्तदानाबाबत जनजागृती घडवण्यास मदत झाली असून, समाजसेवा हीच खरी गुरुभक्ती आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
