बंडगार्डन पोलिसांची मोठी कामगिरी : विविध जिल्हे व परराज्यातून शोधून मिळविले मोबाईल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बंडगार्डन पोलिसांनी तांत्रिक तपास करून तब्बल ५ लाख ९१ हजार रुपये किंमतीचे ५० मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळवले. हे सर्व मोबाईल त्यांच्या मुळ मालकांना परत करण्यात आले.
बंडगार्डन परिसरात हरविलेल्या मोबाईल फोनचा स्वतंत्र डेटा तयार करून त्यावर पाठपुरावा करण्यात आला. विविध जिल्हे तसेच परराज्यात सापडलेले मोबाईल परत आणून नागरिकांना सुपूर्द करण्यात आले.
हस्तगत मोबाईल परत देण्याचा समारंभ पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्या हस्ते पार पडला. या कार्यवाहीत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त संगिता शिंदे आल्फोन्सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप व संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
या कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, निलेश पालवे, शशिकांत खाडे, महेश साळुंखे, प्रविण पाडाळे व महेश जाधव यांनी मोलाची भूमिका बजावली.















