महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भूम : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना.श्री. रामदासजी आठवले यांच्या भूम दौऱ्यावेळी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी शासकीय विश्रामगृह येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीप्रसंगी नगराध्यक्ष गाढवे यांनी केंद्रीय मंत्र्यांचा यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमाला शहरासह जिल्ह्यातील आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.















