भारतात २७ वा, महाराष्ट्रात ६ वा आणि वेस्टर्न झोनमध्ये ८ वा क्रमांक
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : सुर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस (SIHS), कॉलेज ऑफ फिजिओथेरपीने इंडियन इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (IIRF) २०२५ मध्ये उत्कृष्ट यश मिळवले असून राष्ट्रीय स्तरावर २७ वा, महाराष्ट्रात ६ वा आणि वेस्टर्न झोनमध्ये ८ वा क्रमांक पटकावला आहे.
संपूर्ण देशभरात प्रतिष्ठा, पारदर्शकता आणि कॉर्पोरेट मान्यतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या IIRF रँकिंगमध्ये रोजगारक्षमता, अध्यापन-संसाधने, संशोधन, प्लेसमेंट स्ट्रॅटेजी, फ्युचर ओरिएंटेशन, बाह्य प्रतिमा आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या महत्त्वाच्या निकषांवर सखोल मूल्यमापन केले जाते.
या मूल्यांकनात SIHS ने आपली शैक्षणिक उत्कृष्टता आणि सर्वांगीण विकासाची वचनबद्धता अधोरेखित केली आहे. SIHS हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS), नाशिक संलग्नीत असून येथे बॅचलर ऑफ फिजिओथेरपी (B.P.Th.) अभ्यासक्रम राबविला जातो.
इंटरॅक्टिव्ह, एक्स्पिरिएन्शियल, कोलॅबोरेटिव्ह आणि कॉन्सेप्च्युअल अशा अभिनव अध्यापन पद्धतींसह योग, ध्यान, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा, इनोव्हेशन व इन्क्युबेशन यांसारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्लिनिकल प्रशिक्षण देण्यासाठी SIHS ने शाश्वत, कृष्णा, रांका, देवयानी, सुभोध, औंध इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस व नित्यानंद इन्स्टिट्यूट अशा नामांकित मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल्सशी करार केले आहेत.
मस्क्युलोस्केलेटल, न्यूरोलॉजिकल, पेडियाट्रिक व कार्डिओ-पल्मोनरी फिजिओथेरपी शाखांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. तसेच, जनसेवा फाउंडेशन व पानशेतमार्फत ग्रामीण व ज्येष्ठ नागरिक आरोग्यसेवेत योगदान, अभय प्रभवना व फिरोदिया इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी अँड कल्चरद्वारे सांस्कृतिक व नैतिक शिक्षण, आर्टिफिशियल लिम्ब सेंटर पुणे व AIIPMR मुंबई येथे प्रगत प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा अनुभव विस्तारला जातो.
शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्यविकासासाठी ९ तासांचा सायलेंट रीडाथॉन, योग-झुंबा सेशन्स, मेंटर-मेंटी प्रोग्राम, मानसशास्त्रीय समुपदेशन तसेच क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जातो.
आधुनिक पायाभूत सुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग आणि सशक्त इंडस्ट्री सहयोग यांच्या आधारे SIHS भावी आरोग्यनेते घडविण्यास वचनबद्ध आहे. “Excellence in Education, Enrichment in Life” या तत्त्वज्ञानावर आधारित कार्यपद्धतीमुळे SIHS हे शिक्षणासोबतच मूल्य, सहानुभूती आणि सामाजिक जबाबदारी जोपासणारे सक्षम आरोग्यव्यावसायिक घडवत आहे.
“ही IIRF मान्यता ही जागतिक दर्जाचे आरोग्यशिक्षण देण्याच्या आमच्या वचनबद्धतेची साक्ष आहे. SIHS मध्ये आम्ही शैक्षणिक उत्कृष्टतेसह प्रत्यक्ष क्लिनिकल अनुभव व सर्वांगीण शिक्षणाचा संगम घडवतो. आमचे विद्यार्थी हे केवळ कुशल व्यावसायिकच नव्हे तर करुणाशील व समाजाभिमुख नागरिक घडतील, याकडे आम्ही कटिबद्ध आहोत.” – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
“SIHS मध्ये आमचे लक्ष नेहमीच सर्वांगीण विकासावर असते – अभ्यासक्रम, क्लिनिकल प्रशिक्षण, मूल्याधिष्ठित शिक्षण, सांस्कृतिक जाण व आरोग्यसाधना यांचा समन्वय साधण्यावर आम्ही भर देतो. ही राष्ट्रीय मान्यता ही आमच्या प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचे फलित आहे.” – सुषमा चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















