भारतात ४२वा, महाराष्ट्रात ८वा आणि पश्चिम विभागात १०वा क्रमांक
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : बवधान, पुणे येथील सुर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च (SCPHR) या सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या (SEF) नामांकित संस्थेने पुन्हा एकदा राष्ट्रीय व राज्य स्तरावर आपली छाप पाडली आहे. इंडियन इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (IIRF), नवी दिल्ली यांनी जाहीर केलेल्या फार्मसी कॉलेज रँकिंग २०२५ मध्ये SCPHR ने भारतात ४२ वा, महाराष्ट्रात ८ वा व पश्चिम विभागात १० वा क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे.
IIRF रँकिंग हे देशातील शिक्षणक्षेत्र व उद्योग क्षेत्रात अत्यंत प्रमाणित मानले जाते. या रँकिंगसाठी रोजगारक्षमता, अध्यापन व संसाधने, संशोधन, उद्योग-संलग्नता, प्लेसमेंट धोरण, भविष्याभिमुखता तसेच बाह्य धारणा व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या सात महत्त्वाच्या निकषांवर संस्थांचे मूल्यमापन केले जाते.
SCPHR ने या सातही निकषांवर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. SCPHR मध्ये बी. फार्मसी (B. Pharm.) पदवी अभ्यासक्रम (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे संलग्न) व डी. फार्मसी (D. Pharm.) अभ्यासक्रम (महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळ संलग्न) राबवले जातात.
अत्याधुनिक प्रयोगशाळा, संशोधनाभिमुख वातावरण, अनुभवी प्राध्यापकवर्ग व उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. SCPHR ने अलीकडेच राबवलेले काही उपक्रम राष्ट्रीय पातळीवर गाजले आहेत.
१० तासांचा सायलेंट रीडेथॉन २०२५ हा वाचन मॅरेथॉन उपक्रम इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदवला गेला. फार्मोत्सव २०२५ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कला, नेतृत्व व नावीन्यपूर्णता सादर झाली. डी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचने १००% निकालाची नोंद करून शैक्षणिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठेवले.
तसेच आंतरराष्ट्रीय योग दिन, उद्योगभेटी, पाहुणे व्याख्याने व अभ्यासदौरे यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच उद्योगाभिमुख अनुभव मिळत आहेत. १९९९ साली प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी स्थापन केलेले सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आज जागतिक नेतृत्व घडविण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे.
त्यांच्या दूरदृष्टीमुळे सुर्यदत्त समूहाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान मिळाले आहेत. यात सुषमा चोरडिया यांचे योगदानही महत्त्वपूर्ण असून त्यांनी स्त्री सक्षमीकरण, कौशल्य विकास, गुणवत्ता संवर्धन व सामाजिक जबाबदारी यासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
SCPHR च्या या यशाबद्दल सुर्यदत्त व्यवस्थापनाने सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“हे यश गुणवत्तापूर्ण शिक्षण, नवनिर्मिती व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या कटिबद्धतेचे द्योतक आहे. आमचे ध्येय केवळ कुशल औषधनिर्माते घडवण्याचे नसून समाजाभिमुख व राष्ट्रनिर्माणासाठी योगदान देणारे जबाबदार नागरिक तयार करण्याचे आहे. या यशाबद्दल मी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” – प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक अध्यक्ष व चेअरमन, सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन
“SCPHR ने नेहमीच विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धती अवलंबली आहे. शिस्त, मूल्ये व नवनिर्मिती या आधारे जागतिक दर्जाचे व्यावसायिक घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही मान्यता आमचा आत्मविश्वास अधिक दृढ करणारी आहे.” – सुषमा एस. चोरडिया, उपाध्यक्ष व सचिव, सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन















