लायन्स क्लब ऑफ पुणा गणेशखिंडचे योगदान; रुग्णांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : रस्ता पेठ येथील श्री समर्थ हॉस्पिटलमध्ये न्युरो-स्पाईन रिहॅब, ओबेसिटी-न्युट्रिशन सेंटर व नवीन डायालिसीस सेंटरचे भव्य उद्घाटन गुरुवार, २१ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ७.३० वाजता मोठ्या उत्साहात पार पडले.
या सोहळ्यास लायन विजय भंडारी, कर्नल श्रीराम राजमन्नार, आयपीएस संजय पाटील, आयएएस मल्लिनाथ कलशेट्टी, लायन कुरेश पोलेन, लायन श्याम खंडेलवाल, लायन दीपक लोया, जगदीश अगरवाल, लायन श्याम अग्रवाल, लायन गोपालकृष्ण अग्रवाल यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या केंद्राचे संचालक एन. आर. कलशेट्टी व डॉ. स्वप्ना कलशेट्टी आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभम घोगरे, डॉ. श्रद्धा गिरोळा व डॉ. वैश्नवी निकम यांनी केले. लायन्स क्लब ऑफ पुणा गणेशखिंडचे परोपकारी सदस्य लायन श्याम अगरवाल यांनी उदार दानातून डायालिसीस मशीन प्रदान करून श्री समर्थ हॉस्पिटलच्या या प्रकल्पाला मोलाचे योगदान दिले.
आपल्या मनोगतात डॉ. शेट्टी यांनी लायन्स क्लब ऑफ पुणा गणेशखिंडचे आभार मानले. श्री समर्थ हॉस्पिटलच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी मिळणाऱ्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रुग्णांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे नवे सेंटर अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून व्यक्त केले.















