महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात भंडारी कुटुंबाने यंदा “गणपती बाप्पा मोरया” चा विसर्जन सोहळा भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरा केला. वातावरणात भक्तिभाव, प्रेम आणि एकात्मतेची अनुभूती सर्वांना मिळाली.
या पवित्र सोहळ्याला माताजी विमलाबाई भंडारी, विजय भंडारी (अध्यक्ष – जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन – JITO Apex), चेतन भंडारी, भारती भंडारी, लीना भंडारी, शुभम भंडारी, गझल भंडारी आणि पूर्वी भंडारी यांची उपस्थिती लाभली.
संपूर्ण कुटुंबाने बाप्पाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत सामूहिक आरती केली आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषात विसर्जन विधी पार पाडला. विसर्जनानंतर उपस्थित सर्वांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाशी निगडित आठवणी, आशीर्वाद आणि भक्तिभावाने लाभलेला आनंद एकमेकांशी शेअर केला.
संपूर्ण सोहळ्यात भक्तिमय, आनंददायी आणि जिव्हाळ्याचं वातावरण निर्माण झाले. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक परंपरेचा उत्सव नसून सामाजिक एकत्रीकरणाचं प्रतीक आहे. भंडारी कुटुंबाने आपल्या श्रद्धा, भक्ती आणि स्नेहातून याचं उत्कृष्ट उदाहरण साकार केले.
