गांजा विक्री करताना पकडले, पावणे दोन किलो गांजा जप्त : रामटेकडी इंडस्ट्रियल परिसरात कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : रामटेकडी इंडस्ट्रियल परिसरात गांजा विक्री करण्यासाठी थांबलेल्या दोघा अट्टल गुन्हेगारांना पकडून वानवडी पोलिसांनी त्यांच्याकडून पावणे दोन किलो गांजा जप्त केला आहे.
अविनाश श्रीरंग भोंडवे (वय ४१, रा. चुनाभट्टी, गणेश मळा, सिंहगड रोड) आणि संजय विश्वनाथ काथे (वय ३५, रा. गोसावी वस्ती, वैदुवाडी, हडपसर) अशी या अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत.
वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथक २० सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक व पोलीस अंमलदार महेश गाढवे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रामटेकडी इंडस्ट्रियल एरियातील श्रीनाथ फूड कंपनीसमोर दोन जण गांजा विक्री करण्यासाठी कोणाची तरी वाट पाहत थांबलेले आहेत.
खात्रीशीर माहिती मिळाल्यावर तपास पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता, दोघे जण लाल सॅक घेऊन थांबलेले आढळले. पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले, मात्र पोलिसांनी त्यांना अडवून पकडले. त्यांच्या सॅकमध्ये ३४ हजार २४० रुपयांचा १ किलो ७३४ ग्रॅम गांजा मिळाला. वानवडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक सुधीर चौघुले, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, सर्फराज देशमुख, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, बालाजी वाघमारे, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे आणि दीपक क्षीरसागर यांनी केली.
