पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून दिला दिलासा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे अनेक भाग पूरग्रस्त झाले. विशेषतः कांदलगाव, देवगाव आणि इतर काही गावांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरल्याने सुमारे 40 ते 45 घरं पाण्याखाली आली होती. शेतकऱ्यांचेही भरपूर नुकसान झाले असून पिकं खराब झाली.
या कठीण परिस्थितीत लिओ क्लब बार्शी टाउन ने ४५ पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा म्हणून जीवनावश्यक साहित्य वाटप केले. दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये साखर, तेल, गव्हाचे पीठ, चहा-पत्ती, तूरडाळ, हळद, तिखट, मसाले, मीठ आणि तांदूळ यांचा समावेश होता. हे साहित्य पोलीस पाटलांच्या मदतीने लाभार्थींची यादी तयार करून गरजूंपर्यंत पोहोचवण्यात आले.
या उपक्रमावेळी बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बालाजी वळसणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, तसेच कांदलगावचे पोलीस पाटील अश्विनी वाघमारे व देवगावचे पोलीस पाटील विशाल मांजरे उपस्थित होते.
या कार्यात अनेक सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. हे कार्य यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष लिओ CA तेजस रायचूरकर, सचिव लिओ CA श्रेणिक गुंदेचा, कोषाध्यक्ष लिओ रोनक कुंकुलोळ, तसेच प्रकल्प प्रमुख व क्लब संचालक लिओ पवन श्रीश्रीमाळ, लिओ आदित्य सोनिग्रा, लिओ यश मेहता, लिओ अक्षित परमार, लिओ गौरव सुराणा आणि लिओ यश कुंकुलोळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
ही मदत फार छोटी आहे, पण आम्ही युवक लोक शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होतोय. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून किती दुःख होतं, ते शब्दांत सांगता येत नाही. अशा परिस्थितीत मदतीचा हात देणे हेच लिओ क्लबच्या मनातील खरी भावना आहे. आम्ही इतर संस्थांनी देखील पुढे येऊन मदतीचा हात देण्याची विनंती करतो. – लिओ पवन श्रीश्रीमाळ
ही छोटीशी मदत तरीही त्या परिवारांसाठी मोठी आशा आणि आधार ठरली. या उपक्रमातून लिओ क्लबने दाखवून दिले की, प्रत्येक संकटाच्या काळात समाजासाठी उभा राहणारा हात असतो, आणि छोट्या मदतीतही किती मोठा फरक पडतो. – बालाजी वळसणे , पोलीस उपनिरीक्षक
