आरएमडी स्कूल आणि महावीर प्रतिष्ठानच्या सुमारे हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : माँ आशापुरा माता मंदिरात सुरु असलेल्या नवरात्र उत्सवात सुमारे हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्रीसुक्त पठण करण्यात आले. यासाठी आरएमडी स्कूल आणि महावीर प्रतिष्ठानच्या सुमारे हजार विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
पुण्यातील गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आशापुरा माता मंदिरात नवरात्र उत्सव सुरु आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आज सुमारे हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत श्रीसुक्त पठण करण्यात आले.
माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी, चेतन भंडारी, श्याम खंडेलवाल, मंगेश कटारिया, राजेंद्र गोयल, आदेश खिवंसरा आणि ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य यावेळी उपस्थित होते. आपल्या भावी पिढीला आपले उत्सव व सण याचे महत्व समजण्यासाठी त्यांचा नवरात्र उत्सवातील सहभाग वाढवण्यासाठी श्रीसुक्त पठणाचे आयोजन करण्यात आले होते.
यासाठी सुमारे हजार विद्यार्थी उपस्थित राहिले. अनेकांच्या सहकार्यामुळे हे शक्य होत आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून नवीन पिढीचा उत्सवांमधला सहभाग वाढत आहे. या नवरात्र उत्सवामध्ये अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, भजन, श्री सुक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्री देवी सूक्त मंत्र सामूहिक पठण, देवी सहस्रार्चन आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नवरात्र उत्सवामध्ये दररोज सकाळी ६.३० वाजता आरती होत असून ७ ते ९ च्या दरम्यान अभिषेक होत आहे. नवचंडी महायज्ञ दुपारी ३.३० ते सायंकाळी ७ पर्यंत तर, सायंकाळी ७ वाजता महाआरती होत आहे. त्यानंतर देवीचे भजन, देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम माता की चौकी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
आरोग्य शिबिर व स्पेशल फ्लॅश मॉब – नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयु निर्माण हेल्थ फाउंडेशनच्या वतीने उद्या शनिवारी २७ सप्टेंबर रोजी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत असणार आहे. याबरोबरच बुधवारी 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता युवकांचा सहभाग असलेला नवरात्री स्पेशल फ्लॅश मॉब होणार आहे. यासाठी अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहून नवरात्र उत्सवानिमित्त आशापुरा मातेचा आशिर्वाद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष विजय भंडारी यांनी केले आहे.
माँ आशापुरा नवरात्र उत्सवातील महत्वाचे कार्यक्रम –
शनिवार, २७ सप्टेंबर – श्री देवी सुक्त पठण – दु. २
शनिवार, २७ सप्टेंबर – मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी – स. १० ते दु. ४
सोमवार, २९ सप्टेंबर – नवदुर्गा सन्मान पुरस्कार समारंभ – सायं. ७.३०
बुधवार, १ ऑक्टोबर – नवरात्री स्पेशल फ्लॅश मॉब – सायं. ७.३०
