महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
माणकेश्वर : भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील ग्राम महसूल अधिकारी तसेच धाराशिव जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकारी संघाचे अध्यक्ष श्री. विशाल खळदकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांची भेट घेतली.
मराठवाड्यातील अतिवृष्टी व महापूरामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या अतोनात नुकसानीबाबत संवेदनशीलता दाखवत आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत, धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेतला.
या संदर्भातील निवेदन जिल्हा संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल खळदकर, जिल्हा सरचिटणीस संजय माळी, एन. डी. नागटिळक, सचिन पवार, चक्रधर माळी, निलेश काशीद, प्रवीण जामदार, दिनेश बहिर्मल तसेच महसूल कर्मचारी उपस्थित होते.
