बार्शी नगरपरिषद मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी दिलेली माहिती
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : आगामी बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने तयार करण्यात येत असलेल्या मतदार यादीत राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त दोन प्रभागांमध्ये नावे असलेल्या मतदारांची संभाव्य यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
ही यादी नागरिकांच्या पाहणीसाठी बार्शी नगरपरिषद कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच अधिकृत संकेतस्थळावर https://mahaulb.in/MahaULB/index उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, स्वतःचे नाव या यादीत असल्यास आपण कोणत्या प्रभागात मतदान करणार आहात, याबाबत दि. २ नोव्हेंबर २०२५ पर्यंत नगरपरिषदेस लेखी स्वरूपात कळवावे.
निर्धारित कालावधीत उत्तर न दिल्यास संबंधित मतदारांची नावे “दुबार मतदार” म्हणून नोंदवली जातील, असे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण (बार्शी नगरपरिषद) यांनी कळविले आहे.
















