पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वात उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी : भारताचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बार्शी शहर पोलीस स्टेशनतर्फे ‘रन फॉर युनिटी’ या भव्य एकता दौड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता बार्शी शहर पोलीस ठाणे येथून सुरू होणार आहे. ‘एक भारत – एकता आणि अखंडतेसाठी धावूया!’ या प्रेरणादायी घोषवाक्याखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून नागरिक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित आहे.
या उपक्रमाचा उद्देश राष्ट्रीय एकता, बंधुता आणि देशभक्तीचा संदेश समाजात पोहोचवणे हा आहे. या निमित्ताने नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मार्ग – बार्शी शहर पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन स्टॅन्ड चौक, पोस्ट ऑफिस चौक, शाहिर अमर शेख चौक, पांडे चौक, महाद्वार चौक, सावरकर चौक, पटेल चौक, पानखुटं चौक, ऐनापूर मारुती मंदिर, तेलगिरणी चौक हा मार्ग पुन्हा शहर पोलीस ठाण्यावर येऊन संपन्न होईल.
















