महाराष्ट्र न्युज नेटवर्क
भुम : भारताला एकतेच्या सूत्रात गुंफणारे राष्ट्रपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज भुम शहर व तालुक्याच्या वतीने ‘एकता दौड’ आयोजित करण्यात आली. या दौडीस सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या एकता दौडीत उपविभागीय अधिकारी रेवय्या डोंगरे, पोलीस उपअधीक्षक चोरमले, पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, तसेच शिक्षक, माजी सैनिक, नागरिक, पोलीस कर्मचारी आणि विविध अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्वांनी देशाच्या एकतेचा संदेश देत दौड पूर्ण केली. या निमित्ताने सहभागी सर्वांनी सरदार पटेल यांच्या विचारांचा आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या योगदानाचा स्मरण केला. शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. दौड यशस्वीपणे पूर्ण झाल्याबद्दल सर्व आयोजकांचे कौतुक करण्यात आले.

 
			


















