मैत्रीच्या गणपतीचा अनोखा उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गणेशोत्सवादरम्यान मैत्रीच्या गणपतीला भाविकांकडून दान करण्यात आलेली तब्बल १ लाख ५५ हजार २५० रुपये ही रक्कम भिवरी येथील गुरुमाँ डॉक्टर मंजूश्री गोशाळेस भेट देण्यात आली.
मैत्रीच्या गणपतीचे प्रमुख उद्योगपती मनोज छाजेड यांच्या वाढदिवसानिमित्त दानपेटीतील सर्व रक्कम देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी मैत्रीच्या गणपतीचे प्रमुख मनोज छाजेड, गुरुमाँ डॉ. मंजूश्री गोशाळेचे अध्यक्ष ललित जैन, मुकेश छाजेड, रमणलाल शिंगवी, डॉ. सुमतीलाल लोढा, प्रकाश संचेती, जीवन बेद, योगेश मोहोळ, उमेश पाथरकर, शीतल भंडारी, नीरज कांकरीया, सिद्धांत छाजेड, संदेश कदम, महेश सावंत, मनोज रावत आदी उपस्थित होते.
सिद्धी फाऊंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण आणि गोरगरीबांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. संस्थापक अध्यक्ष मनोज छाजेड हे जीतो, लायन्स यांसह अनेक संस्थांमध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
ललित जैन म्हणाले की, समाजहिताचा विचार करून गोशाळेस दिलेली ही मदत कौतुकास्पद आहे. छाजेड परिवाराच्या वतीने गेल्या १८ वर्षांपासून मैत्रीच्या गणपतीचा उपक्रम राबविण्यात येत असून त्यामुळे कौटुंबिक नाती दृढ होत आहेत.
भाविकांकडून गणपतीच्या दानपेटीत दिलेले पैसे हे सामाजिक आणि धार्मिक कामांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे समाजोपयोगी कामासाठी खारीचा वाटा उचलल्याचे समाधान वाटते. – मनोज छाजेड
















