गौतमलब्धि डायग्नोस्टिक सेंटरचा आरोग्यसेवेतील उपक्रम : “Charity with Quality” ध्येयाने सेवा
पुणे : विमाननगर येथे गौतमलब्धि मेडिकल अॅड रिसर्च चॅरिटेबल ट्रस्ट संचालित श्री रमणलाल कपुरचंद लुंकड गौतमलब्धि डायग्नोस्टिक सेंटर मध्ये मोफत नेत्र तपासणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. एच. वी. देसाई आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेला हा उपक्रम सर्वसामान्य व गरजू नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणारा आहे.
समाजसेवा आणि आरोग्यसेवेचा समन्वय साधत “Charity with Quality” या ध्येयाने कार्यरत असलेले हे केंद्र डोळ्यांच्या आजारांचे अचूक निदान, तज्ज्ञ सल्ला आणि गरजेनुसार उपचार उपलब्ध करून देत आहे.
या उपक्रमांतर्गत मोफत संपूर्ण नेत्र तपासणी, चष्मा नंबर तपासणी, रक्तदाब व रक्तातील साखर तपासणी कमी दरात, आवश्यकतेनुसार परवडणाऱ्या दरात चष्म्यांची सुविधा, तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत एच. वी. देसाई आय हॉस्पिटलमध्ये मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
गरजू रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर्सशी थेट समन्वय आणि सरकारी महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत पात्र रुग्णांना लाभ उपलब्ध करून देण्याची सोयही येथे करण्यात आली आहे. केंद्रातील तपासणी दर महिन्याच्या २ऱ्या आणि ४थ्या बुधवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत नेत्ररोग तज्ज्ञांकडून केली जाणार आहे.
“आरोग्य संरक्षण– डोळ्यांची काळजी” हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असून, डोळ्यांचे विकार वेळेवर ओळखून योग्य उपचार घेतल्यास अनेक मोठ्या समस्या टाळता येऊ शकतात, असे आयोजकांनी सांगितले.
विशेषतः ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष असलेली मुले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. विमाननगर, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, वाघोली, लोहगाव, विश्रांतवाडी, धानोरी, आळंदी, येरवडा तसेच पुणे परिसरातील नागरिकांसाठी हे केंद्र सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह ठरत आहे.
केंद्रामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, “डोळ्यांची तपासणी नियमित करा, दृष्टी आरोग्य सुरक्षित ठेवा आणि मोफत तपासणीचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवा.” आधुनिक जीवनशैली, ताणतणाव आणि अनियमित आहारामुळे आजारांचे प्रमाण वाढत असताना, परवडणाऱ्या आणि अचूक तपासण्यांची गरज ओळखून गौतमलब्धि डायग्नोस्टिक सेंटरने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
येथे अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून विविध तपासण्या मार्केट कीमतीपेक्षा २० ते २५ टक्के कमी दरात उपलब्ध करण्यात येत आहेत. ब्लड टेस्ट, शुगर, थायरॉईड, लिपिड प्रोफाईल, किडनी-लिव्हर फंक्शन टेस्ट, CBC, हार्मोन व व्हिटॅमिन तपासण्या, सर्व वयोगटांसाठी हेल्थ चेकअप पॅकेजेस, हृदयरोगासाठी विशेष तपासणी, X-Ray, ECG, Stress Test, घरबसल्या नमुना संग्रह (Home Collection Service), तसेच तपासण्यांचे वेळेवर आणि अचूक रिपोर्ट देण्याची सुविधा केंद्रात सातत्याने सुरू आहे.
केंद्राचा संदेश – नियमित आरोग्य तपासणी करा : आयुष्यभर निरोगी राहा.”















