समर्थ पोलिसांची कारवाई : सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्यांना कठोर संदेश
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आंदेकर टोळीचे उदात्तीकरण करणारे स्टेटस इंस्टाग्रामवर ठेवणाऱ्या समर्थ पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुंड मंथन सचिन भालेराव (वय १९, रा. भवानी पेठ, पुणे) याच्यावर पुणे पोलीस आयुक्तांनी MPDA अंतर्गत स्थानबद्ध कारवाई केली आहे.
मंथन भालेराव याने इंस्टाग्राम अकाउंटवर आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवून टोळीचे उदात्तीकरण केले होते. त्यावेळी समर्थ पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेत, पोलीस आयुक्तांनी या कारवाईद्वारे धडा शिकवला आहे. समर्थ पोलीस स्टेशनतर्फे मागील काही महिन्यांतील ही पाचवी MPDA कारवाई आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त (फरासखाना विभाग) अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे, तसेच पोलीस हवालदार प्रसाद दोड्यानूर, जोरकर, वाघेरे, दराडे, शेख (समर्थ पोलीस स्टेशन) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.















